कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतातशाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतातसध्या काम कमी अन् वेळ भरपूरकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करूनकाय करणार सध्या बेंच वर आहेकारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
दिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतो कंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतो चार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्याकॉलेज canteenच्या कटींगची सर नाही त्यालाकंपनीतले बेचव जेवण गोड मानून घेतो आहेकारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
कट्ट्यावरच्या गप्पा तर कधीच मागे पडल्याA\C Coneference rooms मध्ये आता मीटिंग्स होऊ लागल्याटीम - मेटसच्या गर्दीत माझ्या मित्रांची टोळी हरवली पक्या, अज्या, रघूची जागा आता मूर्थी , कृष्णन आणि रेवतीने घेतली ODCमध्ये एकतरी मराठी माणूस शोधतो आहेकारण शेवटी मी एक Software प्रोफेशनल आहे
सुरुवातीला खूप फोन SMS व्हायचेकोण कुठे काय करतोय लगोलग कळायचेआजकाल जो-तो project मध्ये बिझी ज़ालायभुला भटका missed call आता महाग झालाय forwards आणि chain mails मध्ये खुषालीची मैल शोधतो आहेकारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
दर वीकएण्डसला मे मल्टीप्लेक्स मध्ये जातोदीड- दमडीच्या मुव्हीसाठी शे- दीडशे मोजतोसेलेब्रेशन्स, पार्टीज साठी pizza hutchaचा रस्ता गाठतोvegie crust, paporonie कसले कसले फ्लेवर्स मागवतो पण pocket moneyसाठवून केलेल्या party ची मजा ह्यात शोधत आहेकारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
रोजचा शिरस्ता म्हणून घरी एक फोन लावतोएकुलता- एक असण्याचे आपले कर्तव्य पार पाडतो" आता कधी येशील?" असे आई रोज विचारते बाबांच्याही आवाजात हल्ली खूप चिंता जाणवते करियर आणि आई -बाबांपैकी मे माझ्या करियरला निवडले आहे कारण शेवटी मी एक software प्रोफेशनल आहे
खरच सारे काही गेलेय आता बदलून एका टॅग ने ठेवलाय माझे आयुष्य जखडूनकधीतरी तो दिवस येईलoffice मधून थेट मी माझ्या घरी जाईनपण मला माहितेय हे एक स्वप्न आहे कारण शेवटी मी एक.....
24 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment